Diwali Pahat 2024
नवरात्र, दसरा संपतो न संपतो तोच घराघरात दिवाळीची तयारी सुरु झालेली असते. आपल्या प्रियजनांबरोबर दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सिॲटल् महाराष्ट्र मंडळ घेऊन येत आहे दिवाळी पहाट, दिवाळीसाठी सांगीतिक कार्यक्रम "सूरप्रभा" - गाण्यांचा श्रवणीय फराळ.
मराठीतील आद्यकवी संत ज्ञानेश्वर ते आधुनिक कवींपर्यंत गाण्यांचा प्रवास उलगडणार आहेत आपले गुणी स्थानिक कलाकार.
दिनांक: 9 नोव्हेंबर 2024
वेळ: सकाळी 10:30
स्थळ: Redmond Senior & Community Center
Address: 8703 160th Ave NE, Redmond, WA 98052
संकल्पना: जयंत भोपटकर, शीतल पटवर्धन-बापट
प्रमुख कलाकार: जयंत भोपटकर, शीतल पटवर्धन-बापट, संकेत जोशी, आशुतोष गलांडे, दीपश्री जोगळेकर
निवेदन: स्नेहल पिटके-कुलकर्णी आणि अमित कुलकर्णी
बाल गायकांपासून स्थानिक नवोदित व नामवंत गायकांचा यात सहभाग आहे आणि त्याला अभ्यासपूर्ण निवेदनाची जोड असेल. तर मग मंडळी, चुकवू नका पहाट दिवाळीची, साथ सुरेल स्वरांची. आजच आपले तिकीट घ्या.😊