पत्रापत्री - Houston

Poster Image

तात्या साहेब पॅरिसला विमानाने जात आहेत. हा प्रवास खूपच प्रदीर्घ आहे. या प्रवासात ते त्यांचे मुंबईत असलेले मित्र माधवराव यांना पत्र लिहू लागतात. अशा प्रकारे दोन मित्रांमधील हस्तलिखित पत्रांची भेट सुरू होते. त्यांच्या सभोवतालच्या बदलत्या काळाचा, त्यांच्या काळातल्या विचारसारणीनुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. दोन मित्रांच्या निखळ निरागसतेमुळे ही पत्रे खूप  मजेदार होतात.

नाट्यलेखक दिलीप प्रभावळकर यांनी तात्यासाहेब आणि माधवराव यांचे जग आणि त्यामधील मजेदार घटना आणि मनोरंजक पद्धतीने मांडल्या आहेत. मारियो मिरांडा यांच्या व्यंगचित्रा सारखेच क्लिष्ट आणि मनोरंजक आहे. निखळ विनोदी पद्धतीने कळप मानसिकतेच्या मूर्खपणावर भाष्य करते. तर कधी मार्मिकपणे विचार मांडते.  बदलत्या काळानुसार त्याचा सामना करणाऱ्या दोन वृद्ध मित्रांची एक गोड कथा आहे. नाटकीय वाचन आणि सादरीकरणाची सुंदर गुंफण या नाटकात करण्यात आली आहे. दोन दिग्गज अभिनेत्यांनी ही दोन पात्रं, त्यांचे जग कथानकाने अक्षरश: जिवंत केले आहे.